धक्कादायक: पुरात स्कुटीसह तरुणी गेली वाहून, तिचा मृत्यू
Nashik: महाविद्यालयीन तरुणी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मुसळधार पाउस सुरु आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात एक महाविद्यालयीन तरुणी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या तन्वी विजय गायकवाड या तरुणीचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेचा थरारक व्हिडियो समोर आला आहे.
निफाड येथील मुळ रहिवासी असणारी तन्वी विजय गायकवाड (वय १७) हिचे वडील विजय गायकवाड काकासाहेब नगर येथे कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करतात. आपल्या वडीलांच्या शाळेत आपण महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे म्हणून ती जवळच असलेल्या शिवडी ता. निफाड येथील बापू क्षीरसागर व शंकर क्षीरसागर येथे मामाकडे राहुन स्कुटीवरुन ये-जा करत महाविद्यालयिन शिक्षण घेत होती.
दोन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याना पुर आला होता. सोमवारी सकाळी ७ वाजता उगाव- खेडे या दरम्यान असलेल्या पुलावरुन पाणी सुरु होते. पुरपरिस्थितीचे गांभीर्य व पाण्याचा अंदाज न आल्याने तन्वीने आपली बँटरीवरील स्कुटी पाण्यात घातली अन् तिथेच तिचा मृत्यू झाला.
Web Title: young woman was washed away with a scooty in the flood, she died