अहमदनगर: विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
Ahmednagar | Kopargaon News: विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेला असता त्याठिकाणी विजेच्या धक्का (Electric Shock) बसून त्यात त्यांचे निधन.
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी राजेंद्र दत्तात्रय शिंदे (वय – ३२) आपल्या शेतातील विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेला असता त्याठिकाणी विजेच्या धक्का बसून त्यात त्यांचे निधन झाले आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, पाऊस पाणी भरपूर असल्याने व शेतात सर्वत्र पाणीच पाणी आहे. त्यामुळे शेतकरी घरीच आहे. मात्र आपले पशुधन वाचविण्यासाठी त्यास दानापाणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आपले पशुधन वाचविण्यासाठी व आपल्या दैनंदिन पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी आपल्या विहिरीवर जाणे क्रमप्राप्त आहे. त्यातून अनेक दुर्घटना घडत आहे. अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील करंजी परिसरात घडली आहे. दि. १२ सप्टेंबर २०११ रोजी सकाळी ८.१० वाजेच्या सुमारास मयत इसम राजेंद्र शिंदे हे आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेले असता त्याठिकाणी त्यांना जोराचा विद्युत धक्का बसला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा ओरडण्याचा आवाज त्यांच्या भावाने ऐकला होता. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. व त्यांना उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.
Web Title: One died due to electric shock