अहमदनगर: परीक्षेसाठी कॉलेजला गेलेल्या युवतीला पळविले
Ahmednagar News | अहमदनगर: अहमदनगर भिंगार शहरातून युवतीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. घरातून कॉलेजला परीक्षेसाठी बाहेर पडलेल्या युवतीला पळवून (Kidnap) नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित युवतीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भिंगार शहरात राहणार्या फिर्यादी यांची मुलगी बुरूडगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये शिक्षण घेते. दि. 27 मे रोजी फिर्यादी यांच्या मुलीची युनिट टेस्ट चाचणी परिक्षा असल्याने तिला सकाळी 11 वाजता तिच्या भावाने कॉलेजमध्ये सोडले होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाईलवर फिर्यादी यांच्या मुलीच्या मैत्रिणीचा फोन आला. तुमची मुलगी पेपरसाठी आली नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे पालकांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अखेर मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Ahmednagar News Kidnap a young woman who went to college for exams