देशभरात पेट्रोल ९.५ तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त, केंद्र सरकारची मोठी घोषणा
Petrol Diesel Rate: केंद्रसरकारने एक्साईज कर कमी केल्याने देशभरात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे. पेट्रोलवरचा ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपयांनी एक्साईज कर कमी करत असल्याची घोषणा निर्मला सीतारमन यांनी केली.
यामुळे पेट्रोलच्या दरात ९.५ तर डिझेलच्या दरात ७ रुपयांची घट होईल असे सीतारमण यांनी सांगितले आहे. नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येत असल्यामुळे राज्यांनी पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. या मुद्द्यावरून त्यावेळी वाद निर्माण झाले होते. राज्य सरकारच्या करांमुळे मोठ्या प्रमाणावर किमती वाढत आहे असे पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले होते.
Web Title: Petrol Diesel Rate Petrol is cheaper by Rs 9.5 and diesel by Rs 7 across the country