Home अहिल्यानगर तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

Ahmednagar Suicide Case finding the body of a young man in a well

Ahmednagar Suicide | अहमदनगर: पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील तरूणाचा मृतदेह अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे शेतातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

प्रसाद रघुनाथ साबळे (रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्या तरूणाने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रविवारी त्याचा मृतदेह अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे शेतातील विहिरीत आढळून आला. गेल्या तीन दिवसांपासून प्रसाद साबळे हा तरूण घरातून निघून गेला होता. त्याच्या घरच्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मिसिंगची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान प्रसादच्या जाण्याने त्याच्या परिवारासह मित्रांना धक्का बसला असून अवघ्या ११ महिन्यापूर्वी प्रसादचा विवाह झाला होता,त्या च्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Ahmednagar Suicide Case finding the body of a young man in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here