Crime News: दोन गटांत लाकडी दांडक्याने व गजाने मारहाण
पाथर्डी | Crime News: पाथर्डी शहरातील दोन गटांत जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.शहरातील भांडकर ट्रान्सपोर्ट शेड समोर जागेच्या वादातून दोन गटांत हाणामारी होऊन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांसह अन्य लोकांच्या विरोधात अनुसूचित जाती कायद्यान्वये तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या हाणामारीच्या प्रकारामुळे बाजारपेठेत चर्चेचा विषय बनला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कांबळे व त्याचे मित्र कुलदीप भांडकर यांचे भांडकर ट्रान्सपोर्ट शेडच्या दुरुस्तीचे काम करीत असताना आरोपी समर्थ प्रमोद भांडकर, मंगेश दिलीप भांडकर, दिलीप बबनराव भांडकर, प्रमोद बबनराव भांडकर, श्रीकांत श्रीकिसन जाजू हे सर्वजण तेथे आले. तुम्ही येथे काम करू नका, असे म्हणून शिवीगाळ करू लागले. आरोपी समर्थ भांडकर व मंगेश भांडकर यांनी कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडके व गजाने मारहाण केली.
कुलदीप भांडकर यांना देखील मारहाण करून या जागेत पुन्हा आला तर दोघांनाही जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS
तर समर्थ प्रमोद भांडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी कुलदीप भांडकर, सुभाष पवार, बबलु कांबळे, पप्पू चौनापुरे (सर्व रा. पाथर्डी) यांनी समर्थ व त्यांचे चुलते विजयकुमार भांडकर हे कोरडगाव चौकाकडे जाऊन सामायिक जागेवर शेड ठोकू नका असे सांगत असताना त्यांनी फिर्यादी समर्थ भांडकर यांना शिवीगाळ व लोखंडी पाईपने मारहाण करून दुखापत केल्याने पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास व अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे करीत आहेत.
Web Title: Crime News Beaten in two groups with wooden sticks and clubs