पत्नीला मारहाण करून पतीने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
राहुरी | Suicide: पत्नीला मारहाण केल्यानंतर पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे रविवारी घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
काशिनाथ गीताराम शिंदे व १९ रा. कोल्हार खुर्द ता. राहुरी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
काशिनाथ आणि त्याच्या पत्नीचे रविवारी भांडण झाले. यावेळी काशिनाथ याने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर भीतीपोटी काशिनाथ यानेही जवळच असलेल्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान मयत काशिनाथ याच्या पत्नीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, उपनिरीक्षक बिरज बोकील यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: husband committed suicide by jumping into a well