या कारणावरून टायगर श्रॉफ व दिशा पटनीविरोधात गुन्हा दाखल
मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ व अभिनेत्री दिशा पटनी या दोघांविरोधात वांद्रे पोलिसांत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरून साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोन रुग्ण कमी होताना दिसत आहे, त्यामुळे काही निर्बंध हटविण्यात आले आहे, याचाच फायदा घेत काही जण घराच्या बाहेर पडत आहे, अशातच टायगर श्रॉफ व दिशा पटनी व त्यांचा चालक या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफ व दिशा पटनी हे जिमनंतर ड्राईव्हसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. कोणत्याही वैध कारणाशिवाय फिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime filed against Tiger Shroff and Disha Patni