अहिल्यानगर: विवाहित महिला बेपत्ता
Ahilyanagar Missing Case: आजारी असलेल्या नातेवाइकाला भेटून येते असे सांगून घर सोडून गेलेली एक विवाहित बेपत्ता झाल्याची घटना घडली.
पाथर्डी: आजारी असलेल्या नातेवाइकाला भेटून येते असे सांगून घर सोडून गेलेली एक विवाहित बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. अनिता भागवत धायतडक (वय ३८, रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी) असे तिचे नाव आहे.
या प्रकरणी सासरे कुंडलिक गजाबा धायतडक यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात अनिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. अनिता धायतडक यांच्या घरात सासू सुभद्राबाई, पती भागवत, मुलगा ओमकार, आकाश असे कुटुंबासह एकत्र राहून शेती व्यवसाय करतात. पती भागवत कुंडलिक धायतड ड्रायव्हर आहे. हा २ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास अनिता धायतडक घरातील लोकांना म्हणाली की, पंढरीनाथ गजाबा धायतडक हे आजारी आहे. मी त्यांना भेटून येते असे सांगून घरातुन निघुन गेली. नंतर अनिता धायतडक पुन्हा घरी आली नाही. त्यानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब खेडकर करीत आहेत.
Web Title: Married woman missing