धक्कादायक! नात्याला काळिमा, बापाकडून तब्बल ११ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार
Aurangabad Crime News | औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने एकाच खळबळ उडाली आहे.
औरंगाबादमधील एका सहा वर्षाच्या मुलीवर स्वत:च्या बापाकडूनच लैंगिक अत्याचार (Sexually abused) केल्याचे समोर आले आहे. मुलगी सहा वर्षाची असतानाच तिच्या बापाची तिच्यावर वाईट नजर पडली. यानंतर तब्बल 11 वर्ष तिच्यावर तिच्या बापाकडून अत्याचार (Sexual assault) करत होता. अखेर 11 वर्ष या यातना भोगल्यानंतर पीडित मुलगी अखेर घरातून पळाली. यानंतर तिचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार पोलिसांना मिळाली. पोलसांनी तिची विचारपूस केली असता, तिने या 17 वर्षीय पीडित मुलीने जी कहाणी कथन केली ते ऐकल्यावर पोलिसांना धक्काच बसला. याप्रकरणी, नराधम बापाला, मुकुंदवाडी आणि पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलीचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला. यादरम्यान, ती परभणी येथे असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तिला परभणीहून औरंगाबादला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणले. या पोलिसांनी तिची चौकशी व विचारपूस केली असता, अत्यंत धक्कादायक उघडकीस आला आहे. तिच्या स्वतः च्या बापाने तिच्यावर तब्बल 11 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची माहिती उघडकीस आली.
Web Title: 11-year-old girl sexually abused by father