Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण आले समोर

अहमदनगर ब्रेकिंग: युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण आले समोर

Breaking News | Ahmednagar: बेरोजगार युवकाची व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली.

Youth committed suicide by hanging

जामखेड : तालुक्यातील जातेगाव येथील बेरोजगार युवकाची व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. वैभव मारुती गायकवाड (वय २३) असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सध्या अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरी मिळाली नाही, म्हणून शेती करतात मात्र शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल असे उत्पन्न मिळत नाही, यामुळे कर्जबाजारी वाढत जातो त्यामुळे अनेक तरुण निराशेच्या गर्तेत आहेत, यातच ते आपली जीवनयात्रा संपवत आहेत.

वैभव हा कुटुंबातील कर्ता मुलगा होता. आई-वडील एक भाऊ, बहीण व आजीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावरच होती. घरी पाच एकर जमीन आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरेशे उत्पन्न मिळत नाही. जमिनीवर कर्जही होते सध्या मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहे तरीही आरक्षण नाही. यामुळे नोकरी नाही यातच अनेक तरुणांणावर कर्ज आहेत. रविवारी सकाळी वैभव आपल्या रूममध्ये गेला आणि नैराश्यामुळे घर बंद करून घरात गळफास घेतला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतमाहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश जानकर घटनास्थळी दाखल झाल. मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठविला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले व रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात जातेगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Youth committed suicide by hanging

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here