Home अहमदनगर अहिल्यानगर: तरुणाचा गळा आवळून खून, मृतदेह आढळला

अहिल्यानगर: तरुणाचा गळा आवळून खून, मृतदेह आढळला

Breaking News | Ahilyanagar Murder: एका तरुणास जबर मारहाण करीत जखमी करुन त्याचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना.

Young man strangulated, dead body found

राहता |  एकरुखे:  एका तरुणास जबर मारहाण करीत जखमी करुन त्याचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना राहाता शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील व्यापारी संकुलात घडली आहे.

गणेश भाऊसाहेब कसाब (वय ४२) असे मयताचे नाव आहे. राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यात विकास मंडलिक यांचे गाळ्यासमोर गणेश कसाब यास कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून जबर जखमी केले व त्याचा गळा आवळून खून करून त्याला जीवे ठार मारल्याची फिर्याद त्यांचे बंधू संतोष कसाब याने पोलिसात दिली आहे. ही घटना मंगळवार रात्री घडली. सकाळी नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या सफाई कर्मचारी असलेल्या महिला घटनास्थळाजवळून जात असताना त्यांना मृतदेह आढळून आला. दरम्यान, खुनाचे कारण नेमके समजू शकले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Young man strangulated, dead body found

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here