अहिल्यानगर: ट्रकला वीजतारांचा स्पर्श होऊन चालकाचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: परिसरात जमिनीपासून कमी उंचीवर असलेल्या वीजतारेचा रस्त्याने जाणाऱ्या ट्रकला स्पर्श झाल्याने स्पार्किंग होऊन ट्रकचे मागील दोन टायर फुटले आणि शॉक बसून चालकाचा जागीच मृत्यू.
जामखेड : तालुक्यातील सीतारामगड (खर्डा) परिसरात जमिनीपासून कमी उंचीवर असलेल्या वीजतारेचा रस्त्याने जाणाऱ्या ट्रकला स्पर्श झाल्याने स्पार्किंग होऊन ट्रकचे मागील दोन टायर फुटले आणि शॉक बसून चालकाचा जागीच मृत्यू झाला.
राम मच्छिंद्र निंबाळकर (वय ४०, रा. दूरगाव, ता. कर्जत) असे या चालकाचे नाव असून, त्यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा, वडील असा परिवार आहे. निंबाळकर दूरगाव येथून ट्रकमध्ये विटा भरून खर्डा (ता. जामखेड) येथे सीतारामगडावर येत होते. सीताराम गड परिसरात रस्त्याच्या वरून गेलेल्या महावितरणच्या उच्चदाब वीजवाहिनीच्या तारा जमिनीपासून कमी उंचीवर आहेत. त्यांचा ट्रकला स्पर्श झाला आणि ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यामुळे टायर फुटले. ते पाहण्यासाठी चालक निंबाळकर खाली उतरत असताना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी त्यांना मृत घोषित केले. दूरगाव येथील निंबाळकर यांचे नातेवाईक जमले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.
महावितरणवर गुन्हा दाखल करावा व मृताच्या नातेवाइकांना मदत मिळावी, अशी त्यांची मागणी होती. महावितरणचे अधिकारी खांडेकर म्हणाले, की आम्ही रिपोर्ट पाठवला आहे. अधिकारी पंचनामा करण्यासाठी येतील. खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Driver dies after truck touches power lines
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study