Home पुणे धक्कादायक! भर रस्त्यात तरूणाने स्वत:लाच पेटवून घेतले

धक्कादायक! भर रस्त्यात तरूणाने स्वत:लाच पेटवून घेतले

Breaking News | Jalna Crime: एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना.

young man set himself on fire on the way

जालना:  जालना जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली.   प्रल्हाद भगस असे या तरुणाचे नाव आहे. रात्री दहाच्या सुमारास त्याने स्वत:ला जाळण्याचा प्रयत्न केला. प्रल्हादने रस्त्यावर पळत असतानाच स्वत:ला पेटवून घेतले, ज्यामुळे मोठा भडका उडाला. काही स्थानिक तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता.

मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गावातील एका व्यापाऱ्यासोबत झालेल्या आर्थिक वादामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या प्रल्हाद भगस याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

गावातील एका व्यापाऱ्यासोबत झालेल्या आर्थिक वादातून प्रल्हादने स्वत:ला पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत तो सुमारे 50  टक्के भाजला आहे. जखमी अवस्थेत प्रल्हादला काही तरुणांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सध्या जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Web Title: young man set himself on fire on the way

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here