Breaking News | Chandvad: राहत्या घराजवळील विहिरीत पडून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना.
चांदवड: तालुक्यातील देणेवाडी शिवारातील राहत्या घराजवळील विहिरीत पडून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मनीषा नीलेश देशमाने (वय ३२) व नयन नीलेश देशमाने (वय ९, दोघे रा. देणेवाडी, ता. चांदवड) अशी मृत मायलेकाची नावे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मनीषा देशमाने व मुलगा नयन हे दि. मनीषा देशमाने नयन देशमाने २२ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून लहान मुलांची खेळणी बनविण्यासाठी लागणारी माती घेण्यासाठी गेले होते. परंतु, ते सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पती नीलेश सुभाष देशमाने यांनी चांदवड पोलिसात ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आढळले मृतदेह या दोघांचा शोध सुरू असताना तपास करत असताना शुक्रवारी (दि. २४) रोजी सायंकाळी सुमारास देणेवाडी शिवारातील सुभाष विठ्ठल देशमाने यांच्या शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले.
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसल्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. याबाबतची खबर मृत विवाहितेचा भाऊ भरत फकिरा काटे (रा. सावरगाव, ता. येवला) यांनी चांदवड पोलिसात दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार ए. जी. शिरसाट व प्रदीप सिंग सोळुंकी हे करीत आहेत.
Web Title: Mileka’s death by falling into a well
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News