संगमनेर: जनावरांचे अवशेष नदीत टाकले, दोघांवर गुन्हा
Breaking News | Sangamner Crime: मेलेल्या जनावरांचे कुजलेले अवशेष स्वतःच्या शेतामध्ये टाकले. तसेच यापैकी काही अवशेष व त्याचे घाण पाणी प्रवरा नदीचे पात्रात सोडले.
संगमनेर : मेलेल्या जनावरांचे कुजलेले अवशेष स्वतःच्या शेतामध्ये टाकले. तसेच यापैकी काही अवशेष व त्याचे घाण पाणी प्रवरा नदीचे पात्रात सोडले. यामुळे नागरिकांचे पिण्याचे पाणी दूषित होऊन मानवी आरोग्य धोक्यात येईल, अशी कृती केल्याने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शहरालगतच्या जोर्वे रस्त्यावरील फादरवाडी जवळ सुभाष गुलाब मेहत्रे व अविनाश सुभाष मेहत्रे या दोघांनी आपल्या मालकीच्या शेतामध्ये खड्डे घेऊन या खड्ड्यामध्ये मेलेल्या जनावरांचे अनावश्यक कुजलेल्या अवशेष टाकले. यापैकी काही अवशेष व त्याचे घाण पाणी या दोघांनी प्रवरा नदी पात्र सोडले. याबाबत माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली. नगरपालिकेच्या वतीने शहर पोलिसांना पत्र देण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सुभाष मेहेत्रे व अविनाश मेहेत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Throwing animal remains in the river, a crime against both