Home अहिल्यानगर अहमदनगर: तरुणी विवाहितेची मुलासह शेततळ्यात आत्महत्या

अहमदनगर: तरुणी विवाहितेची मुलासह शेततळ्यात आत्महत्या

Ahmednagar News: शेततळ्यात उडी घेत २५ वर्षीय महिलेने आठ वर्षांच्या मुलासह आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Woman commits suicide in farm with child

नगर: शेततळ्यात उडी घेत २५ वर्षीय महिलेने आठ वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नगर तालुक्यातील आठवड गावच्या शिवारात असलेल्या शेततळ्यात शुक्रवारी (दि. २३) दुपारी ही घटना घडली. नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समोर आले नाही.

कोमल राजेंद्र नवले (वय २५), यश राजेंद्र नवले (८, दोघेही रा. आठवड, ता. नगर) असे मृत झालेल्या मायलेकाचे नाव आहे. याबाबत रामकिसन भगवान जपकर (रा. सालवडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कोमल नवले हिच्या पतीचे दीड-दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ती गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त होती. तरीही शिवणकाम करून ती कुटुंबाला हातभार लावत होती. तिचे सासू-सासरे पंढरपूरकडे पायी दिंडीत गेलेले होते. शुक्रवारी (दि. (२३) दुपारी अचानक तिने टोकाचा निर्णय घेत आपल्या आठ वर्षांच्या मुलासह आठवड गावापासून जवळच असलेल्या शेततळ्यामध्ये उडी घेत आत्महत्या केली. पाण्यामध्ये या दोघांना पाहिल्यानंतर गावातील तरुणांनी तातडीने उपचार व्हावेत यासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक रणजित मारग यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिस अंमलदार धर्मनाथ पालवे अधिक  तपास करीत आहेत.

Web Title: Woman commits suicide in farm with child

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here