Home महाराष्ट्र धूळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी नदीवर गेले अन चौघांचा बुडून मृत्यू

धूळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी नदीवर गेले अन चौघांचा बुडून मृत्यू

Breaking News | Badalapur: उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू झाला.

went to the river to paint and four of them drowned and died

बदलापूर: धुळवडीला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला आहे. बदलापूर शहरातून एक दु:खद घटना समोर आली आहे. बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू झाला आहे.

उल्हास नदीत बुडालेले 4 जण दहावीचे विद्यार्थी होते. धूळवड खेळल्यानंतर चारही जण रंग काढण्यासाठी उल्हास नदीवर गेले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

चामटोली गावाजवळील पोद्दार गृह संकुलातील काही मुलांचा ग्रुप धुळवड संपल्यानंतर रंग काढण्यासाठी उल्हास नदीवर गेला होता.  यावेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले आर्यन मेदर (15 वर्षे) ,आर्यन सिंग (16 वर्षे) ,सिद्धार्थ सिंग (16 वर्षे) ,ओम तोमर (15 वर्षे) या चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे हे चारहीजण दहावीचे विद्यार्थी होते. 17 तारखेला दहावीचा शेवटचा पेपर आहे. मधल्या दिवसात सुट्टी असल्याने त्यांनी धुळवड सण साजरा केला. धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी गेले होते. त्याच वेळेस ही दुर्दैवी घटना घडली.

Web Title: went to the river to paint and four of them drowned and died.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here