Home संगमनेर संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले, दोन गायी दगावल्या

संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले, दोन गायी दगावल्या

Breaking News | Sangamner: सावरगाव तळ येथे बुधवारी (दि.2) दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दाणादण उडाली.

Unseasonal rains lashed Sangamner taluka, killing two cows

संगमनेर: तालुक्यातील सावरगाव तळ येथे बुधवारी (दि.2) दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दाणादण उडाली. यामध्ये गहू कांदा , हरभरा, उन्हाळी बाजरीसह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाई (दगावल्या आहेत. यामुळे शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच अवकाळी पाऊस  सांगितल्याने शेतकर्‍यांची चांगलीच धांदल उडाली होती. मंगळवारी तुरळक पाऊस देखील पडला. मात्र बुधवारी दुपारी सावरगाव तळ परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जवळपास दोन ते अडीच तास चांगलीच हजेरी लावली. यामुळे शेतांमधून अक्षरशः पाणी वाहत होते. तर ओढे-नाले देखील वाहू लागले होते. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. यामध्ये हातातोंडाशी आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तर कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या गोठ्यावर वीज पडून (Lightning Strikes) दोन गाई दगावल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील ज्या गावांमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश आ. अमोल खताळ यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकार्‍यांना दिले आहेत. तर आज नुकसानग्रस्त गावांचा दौरा आमदार खताळ हे स्वतः करणार आहेत.

Web Title: Unseasonal rains lashed Sangamner taluka, killing two cows

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here