संगमनेर, अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचा दणका
Sangamner News: आश्वी व परिसरातील गावांमध्ये अवकाळी पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आश्वी व परिसरातील गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस सुरु झाला. चंदनापुरी येथे देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे आश्वी परिसरातील गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला.
दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठ सजली आहे. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. अशात शुक्रवारी दुपारी तीन वाजता अचानक विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत पणत्या, फटाके, आकाशकंदील, कपडे व इतर दिवाळी साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होती. अचानक पाऊस सुरू झाल्याने विक्रेत्यांची, ग्राहकांची एकच धावपळ उडाली. अकोले शहरासह राजूर परिसरातही जोरदार अवकाळी पाऊस झाला. राजूर येथे सुमारे सव्वा तास मुसळधार पाऊस कोसळला. राजूर परिसरात शुक्रवारी सुमारे सव्वातास मुसळधार पाऊस झाला. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. गव्हाळी परिसरात राजूर ग्रामपंचायतीने बांधलेल्या बंदिस्त गटारीवरील दोन ढापे उन्हाळ्यात फुटले होते. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
Web Title: Unseasonal rain in Sangamner, Akole taluka
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App