संगमनेर: विनापरवाना वाळू वाहतूक; ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त
Breaking News | Sangamner Crime: ट्रॅक्टर आणि सुमारे दीड ब्रास वाळूसह पोलिसांनी २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
संगमनेर: विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या लहानू खेमनर यांच्या ट्रॅक्टरवर संगमनेर तालुका पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, ट्रॅक्टर आणि सुमारे दीड ब्रास वाळूसह पोलिसांनी २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जोर्वे येथील माध्यमिक शाळेच्या कम्पाउंडजवळ आज (शुक्रवार) वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाठ यांना आढळून आला. त्यानुसार ट्रॅक्टर (एमएच १७ एव्ही ७०६५) मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, फिर्यादीमध्ये ट्रॅक्टर मालकाचा कोणताही उल्लेख नव्हता.
तालुका पोलिसांनी परिवहन विभागातून घेतलेल्या माहितीनंतर हा ट्रॅक्टर लहानू खेमनर (रा. अंभोरे) यांच्या नावावर असल्याचे उघड झाले.
तालुका पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, ५५ हजार रुपये किमतीची विना नंबरची ट्रॅक्टर ट्रॉली आणि सुमारे १५ हजार रुपये किमतीची अंदाजे दीड ब्रास वाळू असा एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला, पुढील तपास पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Web Title: unlicensed transport of sand; Seized goods including tractor
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study