Home अहिल्यानगर अहिल्यानगर: एकाच दिवशी दोन मुलींचे अपहरण

अहिल्यानगर: एकाच दिवशी दोन मुलींचे अपहरण

Breaking News | Ahilyanagar Crime: शहरातील सावेडी उपनगर परिसरातून १० एप्रिल रोजी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या सिव्हील हडको, व सिद्धार्थनगर परिसरातील घटना, २ वेगवेगळे गुन्हे दाखल.

Two girls kidnapped on the same day

अहिल्यानगर : शहरातील सावेडी उपनगर परिसरातून १० एप्रिल रोजी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यातील पहिली घटना गणेश चौक, सिव्हील हडको परिसरात घडली. या ठिकाणी नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहात असलेली १३ वर्षीय मुलगी ही क्लासला न गेल्याने तिचे नातेवाईक तिला कडक शब्दात रागवल्याने ती घरात कोणास काही एक न सांगता घराबाहेर गेली. ती घरी परतली नाही. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा क्लास, आनंद विद्यालय, जॉगिंग पार्क, सावेडी, तारकपुर परिसर व तिच्या मैत्रिणीकडे, तसेच नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही. यावरुन तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणाकरीता अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत तिच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत सिद्धार्थनगर परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या घरच्यांनी दुपारी १२.३० च्या सुमारास किराणा दुकानात तेल पिशवी आणण्याकरिता पाठवले असता तिला कोणीतरी त्यांचे कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले, मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी तिचा नगर शहरात मैत्रिणीकडे व नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला असता की मिळून आली नाही. त्यामुळे तिचे कोणीतरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत तिच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, वा फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two girls kidnapped on the same day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here