अनैतिक संबंधाच्या संशयावरून आधी पत्नीला विळ्यानं वार करून संपवलं, नंतर पतीनेही लावली गळ्याला दोरी
Washim Crime : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना.
वाशीम: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वाशिमच्या पिंपरी बुद्रुक येथे घडली आहे. यामुळे वाशिममध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वाशिमच्या मंगरुळपिर तालुक्यातील पिंप्री बु (खरबी) येथील वर कुटुंबात पती-पत्नीत अनैतिक सबंधातून वाद निर्माण होऊन जोरदार भांडण झाले होते. पती गौतम वर (50) याने पत्नी ज्योती गौतम वर (45) झोपेत असताना तिच्यावर महिलेवर लोखंडी हायड्रॉलीक आणि विळ्याने वार करत पत्नीची हत्या केली.
यानंतर रक्ताने भरलेल्या अंगाने पती गौतमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मंगरुळपिर पोलीस ठाण्याचे सुधाकर आडे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे वाशिममध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: suspicion of having an immoral relationship, the wife was first killed by being stabbed