पुणे- नगर महामार्गावर ट्रॅक्टर दुचाकीत अपघात, शिक्षक ठार
Accident News: कारेगाव (ता. शिरूर) येथे ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना.
शिरूर: पुणे- नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथे ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली.
संजय सीताराम कदम (वय ४५, रा. शिक्रापूर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब धुमाळ (रा. पिंपळे खालसा, ता. शिरूर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगाव येथील एचडीएफसी बँकेसमोर ट्रॅक्टरची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कदम यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
या अपघातातील ट्रॅक्टरचालक महेश किसन चव्हाण (रा. उंबरखेडा, ता. कन्नड) याला अटक करण्यात आली आहे. मयत संजय कदम हे वढू बुद्रुक येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत होते.
Web Title: Teacher killed in tractor-bicycle accident on Pune-Nagar highway Accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App