Home अहिल्यानगर हृदयद्रावक! बोअरवेलमध्ये पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

हृदयद्रावक! बोअरवेलमध्ये पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Ahmednagar News: कोपर्डीत येथे १५ फुट खोल बोअरवेलमध्ये पडल्याने एक पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू (Died) झाल्याची घटना .

Five-year-old boy dies after falling into a borewell

कर्जत:  अहमदनगरमधील कोपर्डीत येथे १५ फुट खोल बोअरवेलमध्ये पडल्याने एक पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास खेळत असताना ही घटना घडली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून सुरू होते. मात्र, या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

तालुक्यातील कोपर्डी नजीकच्या तुकाईचे लवण येथील बोअरवेलमध्ये पाच वर्षाचा मुलगा पडल्याची घटना सोमवारी ( दि.13)  सायंकाळी घडली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळवर बचाव कार्य सुरू आहे.

सागर बुद्धा बारेला असे मुलाचे नाव असून तो मध्यप्रदेशातील ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये सोमवारी सायंकाळी खेळत असताना तो यात पडला. घटनेची माहिती तात्काळ कर्जत पोलिसांना देताच प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस कॉन्स्टेबल अमित बरडे, गोवर्धन कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मुलाला वाचवण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. जेसीबीच्या मदतीने माती काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. 108 रुग्णवाहिका तसेच अग्निशमन गाड्या घटनास्थळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे आणि अहमदनगर येथून आपत्ती निवारण दलाचे पथक मदत कार्यासाठी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरूच होते. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत 12 फूट खोलीवर बाजूचे उत्खनन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सागरचे कुटुंब उसतोडणीसाठी मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात आले होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या ऊसाच्या शेतात ते कामाला होते. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सागर खेळत असताना शेतातील बोरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सारगला वाचवण्यासाठी समांतर दोन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आलं. त्याला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच सागरचा दुर्देवी मृत्यू झाला.

Web Title: Five-year-old boy dies after falling into a borewell

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here