Home पुणे लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या, पाच जणांवर गुन्हा

लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या, पाच जणांवर गुन्हा

Breaking News | AHmednagar Crime: लग्न करण्यासाठी बळजबरी केली. लग्न न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी आरोपींनी धमकी दिली.

Suicide of a young man due to arranged marriage, crime against five people

लोणी काळभोर | पुणे: परिसरात लग्न करण्यासाठी बळजबरी केल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २१ मे २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच ते सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी सोमवारी (२२ जुलै २०२४) पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुदर्शन ज्ञानेश्वर काळभोर (वय २०, रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विजया ज्ञानेश्वर काळभोर (वय ४८ रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून निकिता अशोक ससाणे, शुभम रवी ससाणे, स्वयम रवी ससाणे, अशोक देवराम ससाणे आणि आरणे मामी (रा. तारासिटीसमोर, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजया काळभोर यांचा मुलगा सुदर्शन काळभोर याला वरील आरोपींनी लग्न करण्यासाठी बळजबरी केली. लग्न न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी आरोपींनी धमकी दिली होती. दरम्यान, आरोपींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून सुदर्शन याने गेल्या वर्षी (२१ मे २०२३) राहत्या घरात गळफास

घेत आत्महत्या केली होती. सुदर्शनच्या आईने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायदंडाधिकारी फौजदारी न्यायालयात एस. जी. बरडे यांच्याकडे दाद मागितली होती. न्यायालयाने ११ जुलै रोजी तपास करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करा, असे आदेश लोणी काळभोर पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Suicide of a young man due to arranged marriage, crime against five people

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here