Home पुणे मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वारंट जारी

मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वारंट जारी

Breaking News | Manoj Jarange Patil: नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचे प्रकरण, गुन्ह्याच्या सुनावणीस हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी.

Arrest warrant against Manoj Jarange

पुणे : नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या सुनावणीस हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे.

मनोज जरांगे, अर्जुन जाधव व दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या मशंभूराजेफ या नाटकाचे सहा प्रयोग २०१३ मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये तक्रारदारांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. परंतु, या प्रयोगांचे पूर्ण पैसे तक्रारदारांना

देण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत घोरपडे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात न्यायालयाने जरांगे यांना दोनदा समन्स बजाविले होते. मात्र, आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते.

अखेर अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आल्यानंतर जरांगे मेअखेरीस न्यायालयात हजर झाले होते. तेव्हा न्यायालयाने जरांगे यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटींवर हे वॉरंट रद्द केले होते. परंतु, त्यानंतरही जरांगे सुनावणीला गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे.

Web Title: Arrest warrant against Manoj Jarange

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here