धक्कादायक! प्रेमीयुगुलाचे अश्लील व्हिडीओ शूटिंग, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार
Amravati Crime: अल्पवयीन मुलगी व तिच्या मित्राचा अश्लील व्हिडीओ काढून, तो व्हायरल करण्याची धमकी देत त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना.
अमरावती: एक अल्पवयीन मुलगी व तिच्या मित्राचा अश्लील व्हिडीओ काढून, तो व्हायरल करण्याची धमकी देत त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास चांदूर रेल्ट तालुक्यातील एका गावालगतच्य शेतशिवारात घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी १६ एप्रिल रोजी मुख्य आरोपी राजा राऊत (रा. चांदूर रेल्वे) याच्यासह संदीप चौधरी व धनंजय अशा तिघांविरुद्ध बलात्कार, विनयभंग, खंडणी व पोक्स अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तीन आरोपी पसार झाले आहेत.
दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी व तिनही आरोपी परस्परांच्या परिचयाचे आहेत. दरम्यान त्या मुलीची एका तरुणासोबत मैत्री आहे, ते घरी सांगू, अशी भीती घालून तिनही आरोपी मुलगी व तिच्या मित्राला ऑटोत बसवून शिरजगाव कोरडे शिवारात घेऊन गेले. १५ मार्च रोजी घडलेल्या या घटनेदरम्यान आरोपींनी मुलगी व तिच्या मित्राची अश्लील व्हिडीओ शूटिंग केली. ती शूटिंग व दोघांच्या मैत्रीची माहिती दोघांच्याही कुटुंबीयांना सांगण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी आरोपींनी त्या युगुलाला पैशाची मागणी केली. . त्यामुळे घाबरून पीडिताच्या मित्राने आरोपींना दोन दिवसांनी दोन हजार रुपये नेऊन दिले. त्यानंतरदेखील राजा राऊत हा पीडितला त्रास देत होता.
११ एप्रिल रोजी राजा राऊत व धनंजय नामक आरोपीने पीडिताच्या मित्राला पुन्हा दमदाटी केली. त्याचदिवशी राजा राऊत हा पीडिताला भीती दाखवून त्याच्या दुचाकीवर तालुक्यातील एका रस्त्यालगतच्या शिवारात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली. आरोपीने तिला शहरात सोडून दिले. तिने कसेबसे घर गाठले. मात्र, गुदरलेला प्रसंग सांगायचा तरी कसा, असा प्रश्न तिला पडला. अखेर १५ एप्रिल रोजी सायंकाळी तिने भावाजवळ मन मोकळे केले. त्याने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
Web Title: Shooting obscene video of lovers, rape threatening to go viral
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App