Home क्राईम पती कामावर असताना नात्यातील व्यक्तीने विवाहित महिलेवर केला अत्याचार

पती कामावर असताना नात्यातील व्यक्तीने विवाहित महिलेवर केला अत्याचार

Beed Crime: जबरदस्ती करीत वाच्यता होऊ नये म्हणून सहन करीत असलेल्या २३ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार (Rape) केल्याप्रकरणी एकावर अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा.

relative rape a married woman while her husband was at work

बीड : फेब्रुवारी २१ मध्ये काही महिने जबरदस्ती करीत वाच्यता होऊ नये म्हणून सहन करीत असलेल्या २३ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा अंभोरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील एका पोलिस गावातील एक २३ वर्षीय विवाहित महिला राहते. पती कामानिमित्त बाहेर असतात. याचा फायदा घेऊन राहत्या घरी व अहमदनगर येथील एका लॉजवर फेब्रुवारी २१ ते ३० नोव्हेंबर २१ या कालावधीत नात्यातील एका ४० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केला. वाच्यता होऊन प्रपंच उद्ध्वस्त होऊ नये म्हणून सहन करीत असलेल्या महिलेने शनिवारी अंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याप्रकरणी आरोपीवर अंभोरा अत्याचार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पिंक पथक प्रमुख धरनीधर कोळेकर करीत आहेत. आरोपी पसार झाला आहे.

Web Title: relative rape a married woman while her husband was at work

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here