संगमनेर: वीज पडली अन क्षणातच होत्याचं नव्हतं झालं
संगमनेर: वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काकडवाडी येथे वादळी पावसात वीज अंगावर पडल्याने ( Lightning struck) दोन संकरित गायी जागीच ठार झाल्या.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काकडवाडी येथे वादळी पावसात वीज अंगावर पडल्याने दोन संकरित गायी जागीच ठार झाल्या. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
काकडवाडी येथे शेतकरी राजाराम शिवनाथ मुळे यांच्या मालकीच्या दोन संकरित गायींवर वादळी पावसात वीज कोसळली. त्यामुळे दोन गायी जागीच ठार झाल्या. संगमनेर तालुका पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पानसरे यांनी मृत गायींचा पंचनामा केला.
वीज अंगावर पडून दोन गायी ठार झाल्याने अंदाजे एक लाख ७० हजार रुपयांचे सदर शेतकऱ्याची आर्थिक हानी झाली. वादळी पावसात वीज पडल्याने दोन गायी जागीच ठार झाल्याने शेतकरी राजाराम मुळे यांच्यावर मोठे संकट कोसळले. क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. सदर शेतकऱ्यास शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काकडवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
Web Title: Lightning struck and it didn’t happen in a moment
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App