आळंदीत खासगी वारकरी शिक्षण संस्थेत पुन्हा लैंगिक अत्याचार
Breaking News | Pune Crime: दिघी पोलीस ठाण्यात संगीत विषयाचे शिक्षक आणि संस्था चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल.
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. आळंदी- देहू फाटा येथे असलेल्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात संगीत विषयाचे शिक्षक आणि संस्था चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी – देहू फाटा येथे एक खासगी वारकरी शिक्षण संस्था आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा तिथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतो. तेथील संगीत विषयाचे शिक्षकाने वारंवार मुलाच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श केला. याबाबत अल्पवयीन मुलाने संस्था चालक यांना ही बाब सांगितली. पण, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.
आळंदीतील खासगी शिक्षण संस्था बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. जानेवारी महिन्यापासून अत्याचाराच हे तिसर प्रकरण आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुद्धा या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं आहे. ४८ तासांमध्ये बेकायदा, अनधिकृत खासगी वारकरी संस्था बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी वीस पथकं नेमून आळंदीत सर्वेक्षणही झालं. मात्र अद्याप किती संस्था बेकायदा, अनधिकृत आहेत. हे समोर आलंच नाही.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
पुन्हा तसाच प्रकार घडल्याने अल्पवयीन मुलाने याबाबत दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिघी पोलिसांनी नराधम संगीत शिक्षका विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संस्था चालकाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून तीर्थ क्षेत्र असलेल्या आळंदीत असे गंभीर प्रकार घडत आहेत. यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. आळंदीतील ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे.
Web Title: Sexual assault again in private Varkari education institute in Alandi