अकोले ब्रेकिंग: राजूरच्या सरपंच पुष्पा निगळे अपात्र, नेमके काय आहे प्रकरण
Rajur News: सरकारी जागेवरील अतिक्रमण मुद्द्यावरून जिल्हाधिकार्यांनी अपात्र, एक सदस्यही अपात्र.
अकोले: अकोले तालुक्यातील राजूरच्या लोकनियुक्त सरपंच पुष्पा दत्तात्रय निगळे यांना सरकारी जागेवरील अतिक्रमण मुद्द्यावरून जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरविले आहे.
गेल्या वर्षी राजूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची जनतेतून निवडणूक झाली. या निवडणुकीत राजूरचे सरपंचपद एसटी महिला राखीव होते. यामध्ये आ. लहामटे गटाकडून पुष्पा निगळे व माजी आ.वैभव पिचड यांच्याकडून माजी सरपंच गणपत देशमुख यांच्या पत्नी शोभा देशमुख यांच्यात सरपंच पदाची लढत झाली होती.
यात अवघ्या 19 मतांच्या फरकाने सौ.देशमुख यांना पराभव पत्करावा लागला होता. पुष्पा निगळे या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्या होत्या. मात्र माजी सरपंच गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या या निवडीला आव्हान देत सरकारी जागेवरील अतिक्रमण मुद्याच्या आधारावर सरपंच पुष्पा निगळे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे तक्रार दाखल करून त्यांना अपात्र करावे, अशी मागणी केली. त्यानुसार दोन्ही बाजूने दावे प्रति-दावे दाखल होऊन सहा सात महिने यावर युक्तिवाद सुरू होता.
दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी यावर निर्णय होऊन अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14(1)( ज-3) प्रमाणे सरपंच पुष्पा निगळे यांना अपात्र ठरवले असून तसा आदेश आज बुधवारी संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजूर वॉर्ड क्रमांक दोन मधील उमेदवार ओंकार नवाळी यांचे देखील ग्रामपंचायत सदस्यत्व त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार अपात्र ठरवण्यात आले आहे.
Web Title: Sarpanch of Rajur Pushpa Nigle is disqualified
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App