संगमनेर : नाशिक- पुणे महामार्गावर सैन्ट्रो कार व इन्होवा कारचा अपघात, सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला निघालेल्या कारला…
Sangamner Accident: नाशिक- पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे सैन्ट्रो कारला इन्होवा कारची धडक बसून अपघाताची घटना.
संगमनेर : नाशिक- पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे सैन्ट्रो कारला इन्होवा कारची धडक बसून अपघाताची घटना बुधवारी मध्यरात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात सॅन्ट्रो कारमधील दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी इन्होवा कारचालकाविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या सैन्ट्रो कारला धडक दिली. या अपघातात सॅन्ट्रो कार (एम. एच. १२, एफ.के. ८७४६) आणि इन्होवा कार (एम.एच.१९ ए.डी. ९७९९) या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. इन्होवा कार चालक अक्षय उत्तम सोनवणे (वय २५, रा. मनेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सैन्ट्रो कार चालक प्रतीक नारायण भोसले (वय २९, रा. फ्लॅट क्रमांक ४०४, अबोली बिल्डिंग, आंबेगाव फाटा, कात्रज, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतीक भोसले हे सॅन्ट्रो कारने पुणे येथून त्यांच्या कुटुंबियांसमवेत सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला निघाले होते. सायखिंडी फाटा येथे गतिरोधकाजवळ इन्होवा कारचालक सोनवणे याच्या ताब्यातील कारची भोसले कुटुंबीय प्रवास करीत असलेल्या सॅन्ट्रो कारला जोराची धडक बसली. या अपघातात भोसले आणि त्यांची आई असे दोघे जखमी झाले. इन्होवा कारचालक सोनवणे हा दारू पिऊन भरधाव कार चालवित होता असे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलिस नाईक ज्योती नानासाहेब दहातोंडे पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Santro car and Inhowa car accident on Nashik-Pune highway
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App