Home अहिल्यानगर अहमदनगर ब्रेकिंग: विवाहीत पुतणी दुसऱ्या तरूणाशी बोलताना दिसली, त्यानंतर काकाने केलं धक्कादायक...

अहमदनगर ब्रेकिंग: विवाहीत पुतणी दुसऱ्या तरूणाशी बोलताना दिसली, त्यानंतर काकाने केलं धक्कादायक कृत्य

Ahmednagar News: एका विवाहित तरुणीची तिच्या काकानेच हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना.

sensational incident of a married young woman being murder by her uncle

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे एका विवाहित तरुणीची तिच्या काकानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. माहेरी आलेली ही तरूणी घराबाहेर एका मुलाशी बोलत होती, हे पाहून काका संतापला आणि त्याच भरात त्याने हे कृत्य केल्याचे समजते.  याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीसांनी आरोपी काकाला अटक केली आहे.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारासा घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण गाव हादरलं. मृत तरूणीच्या आईने पोलिसांत धाव घेत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कोपरगाव शहर पोलीसांनी आरोपीच्या संतोष आरणे ( वय २६) मुसक्या आवळल्या. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहरातील खडकी भागात हा दुर्दैवी प्रकार घडला. तेथे बुधवारी रात्री १२ च्या सुमारास काकाने हल्ला केल्या ज्यामध्ये पुतणीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पुतणी नेहा ही त्यांची २१ वर्षीय विवाहीत मुलगी गेल्या काही महिन्यांपासून माहेरी रहात होती. बुधवारी रात्री ती घराबाहेर येऊन एका तरूणाशी बोलत होती. तेवढ्यात तिचा काका संतोष आरणे याने हे दृश्य पाहिले. त्याला तिच्यावर संशय आला, तो संतापला आणि रागाच्या भरात तो कुऱ्हाड घेऊन आला. त्याने नेहाच्या दोन्ही पायांवर धारदार कुऱ्हाडीने वार करून तिला जबर जखमी केले.

हे पाहून कुटुंबियांनी तिला उपचारासांठी तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बराच रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

मृत तरूणीच्या आईच्या फिर्यादीच्या आधारे कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी संतोष याला अटक केली.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष आरणे याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 494/23 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

Web Title: sensational incident of a married young woman being murder by her uncle

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here