संगमनेर धक्कादायक घटना: काका तुमच्या चलनावर नोटांचे नंबर टाकून देतो असे म्हणत मोठी फसवणूक
Sangamner Crime: अज्ञात तरुणाने ५३ वर्षीय शेतकर्याने बँकेत भरण्यासाठी आणलेल्या रुपयांतून ५८ हजार रुपये लांबविल्याची घटना.
संगमनेर: काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देतो असे म्हणत अज्ञात तरुणाने ५३ वर्षीय शेतकर्याने बँकेत भरण्यासाठी आणलेल्या रुपयांतून ५८ हजार रुपये लांबविले. ही घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील जाणता राजा मैदान येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दलू लहानभाऊ गुंजाळ (वय ५३, रा. पिपरणे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयडीबीआय बँकेची जा राजा मैदान येथे शाखा आहे. तेथे गुंजाळ हे रुपये भरण्यासाठी गेले होते. त्यांच्याजवळ आलेला अज्ञात तरुण से रांगेत उभे असताना त्यांच्याजवळ आलेल्या आलेल्या अज्ञात तरुणाने त्यांना ‘काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देवो’ असे म्हणाला. त्याने गुंजाळ यांना बाजू घेतले. त्यांच्या हातातील पैशांचे बंडल घेऊन स्लिपवर नोटांचे नंबर टाकत असताना पैशांचे बंडल खालीवर केले. गुंजाळ यांची नजर चुकवून त्याने ५०० रुपये किमतीच्या १२६ नोटा असे एकूण ५८ हजार रुपये लांबविले. बँक खात्यात रुपये भरत असताना त्यात ५८ हजार रुपये कमी असल्याचे गुंजाळ यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान अशा प्रकारच्या भामट्यापासून नागरिकांनी सावध रहावे.
Web Title: Sangamner Crime unknown youth withdrew 58 thousand rupees
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App