Home क्राईम संगमनेर: हॉटेल सेलिब्रेशन राडा; चार जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: हॉटेल सेलिब्रेशन राडा; चार जणांवर गुन्हा दाखल

Sangamner Crime:  हॉटेल मालकास मारहाण, सोन्याचे चैन आणि रोख रक्कम चोरल्या प्रकरणी शहरातील चार जणांविरुद्ध जबरी चोरीचा आणि मारहाणीचा गुन्हा.

Hotel Celebration Rada Crime has been registered against four

संगमनेर:  रात्रीच्या वेळी हॉटेलचे कामकाज बंद झाल्यानंतर जेवण्यास दिले नाही म्हणून हॉटेल मालक, त्यांचा मुलगा यांना मारहाण करून हॉटेलमध्ये गोंधळ घालित खुर्च्याची फेकाफेक करीत सोन्याचे चैन आणि रोख रक्कम चोरल्या प्रकरणी शहरातील चार जणांविरुद्ध जबरी चोरीचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे, दीपक रणसुरे, (सर्व राहणार संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

संगमनेर शहरातील बस स्थानक ते बीड कॉलेज रोडवर असणाऱ्या हॉटेल सेलिब्रेशन या ठिकाणी वरील घटना घडली असून यासंदर्भात हॉटेलचे मालक अंकुश सुरेश अभंग यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री हॉटेल बंद करण्याच्या वेळी हॉटेलमध्ये (कॅफे सेक्शन) एक महिला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास येऊन बसली व तिने थोड्यावेळाने फोन केल्यानंतर हॉटेलच्या गेटवर सम्राट हासे नावाचा मुलगा आला. परंतु गेट बंद असल्याने वॉचमन याने त्यास हॉटेल बंद झाल्याचे सांगितले पण सदर मुलाने बाचाबाची करीत व वाद घालीत हॉटेल मध्ये प्रवेश केला व तो अनोळखी लेडीज कस्टमर सोबत टेबलवर जाऊन बसला. तसेच जेवणाची ऑर्डर देऊ लागला परंतु रात्रीचे अकरा वाजून गेल्याने हॉटेल बंदचा वेळ झालेला असल्याने सर्विस स्टाफने नकार दिला. मी देखील हॉटेल बंद झाले सांगून जेवण उपलब्ध नसल्याचे सांगितले,

त्यावेळी समजून सांगत असताना हासे याने फोन करून योगेश सूर्यवंशी, दीपक रणसुरे आणि विकास डमाळे यांना तेथे बोलावून घेतले. त्यानंतर पाचच मिनिटात ते सर्व तेथे हॉटेलवर आले. मला व माझ्या मुलास (वेदांत अंकुश अभंग) याला शिवीगाळ करून दमदाटी करू लागले. त्यावेळी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता या सर्वांनी मिळून काही ऐकून न घेता योगेश सूर्यवंशी याने माझ्या कानाखाली जोराने मारले व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी योगेश सूर्यवंशी याने माझ्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन काढून घेतली.

तसेच माझा मुलगा वेदांत अंकुश अभंग याला सर्वांनी मिळून मारहाण करीत फरपटत ओढत नेले व त्याच्या पॅन्टच्या खिशातील ३० हजार ७०० रुपये एवढी रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यावेळी मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता हॉटेलमधील प्लास्टिकच्या खुर्च्या व भांडे उचलून अंगावर फेकून मारहाण केली. तसेच मला, सर्व्हिस बॉय, वेटर यांना मारहाण करण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी येऊन मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद अंकुश सुरेश अभंग यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे आणि दीपक रणसुरे यांच्याविरुद्ध जबरी चोरी, मारहाण करणे असा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करत आहेत.

Web Title: Hotel Celebration Rada Crime has been registered against four

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here