Home क्राईम संगमनेर शहर पोलीस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्याचा प्रयत्न

संगमनेर शहर पोलीस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्याचा प्रयत्न

Sangamner Attempted suicide by pouring petrol

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एक महिला पतीविरोधात फिर्याद देण्यासाठी आली होती. त्या महिलेच्या पतीने पोलीस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी या व्यक्तीला पकडल्याने मोठा अनर्थ टळला.

गणेश चंद्रभान गायकवाड वय ३१ रा. खांडगाव असे या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्सी टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राजक्ता गणेश गायकवाड ही महिला पती गणेश गायकवाड याच्याविरोधात फिर्याद देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आली होती. त्यादरम्यान गणेश हा देखील तेथे आला. पोलीस ठाण्यात आरडाओरडा सुरु केला मला माझी मुलगी माझ्या ताब्यात डे असे तो ओरडत होता. पोलिसांनी त्याला समजावून सांगितले. मात्र त्याचे ओरडणे सुरूच होते. नंतर तो तेथून निघून गेला. पुन्हा काही वेळाने एक बाटली हातात घेऊन आला. त्या बाटलीमधील द्रव्य पदार्थ अंगावर ओतून घेतले. पोलिसांनी लगेचच त्याच्याकडे धाव घेतली व त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी अधिक तपास विजय खाडे हे करीत आहे.  

Web Title: Sangamner Attempted suicide by pouring petrol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here