Home क्राईम संगमनेर: महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी  

संगमनेर: महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी  

Sangamner Threats to kill women with racist insults

संगमनेर | Sangamner: धान्याचे पोते ढकलून दिल्यामुळे जाब विचारायला गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून थेट फाशी देऊन मारण्याची धमकी संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथे घडली आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भाऊसाहेब सखाराम सातपुते यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादिनुसार  माझ्या घरासमोर मोठा भाऊ गणपत लावरे याने एक वर्षापूर्वी पत्र्याचे शेड बांधले होते. १४ मे रोजी १२ वाजेच्या सुमारास शेडला मोठ्याभाऊ लावरे व त्याचे नातेवाईक असलेले अन्य नातेवाईक हे शेडला चारही बाजूनी जाळी लावत होते. यावेळी त्यांनी आमच्या घरासमोरील धान्याचे पोते ढकलून दिल्यामुळे धान्याची गोनी फुटल्याने माझ्या पत्नीने त्याना विचारणा केली असता या सर्बानी ही जागा तुमच्या बापाची आहे का? तुमच एकच घर आहे तुम्हाला केव्हाही मारून टाकू असे म्हणून पत्नीला मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे व भागवत लावरे या तिघांनी ढकलून दिली यामुळे ती घरासमोरील पलंगावर पडली व हातातील बांगड्या फुटल्या आहेत.

यानंतर मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे, भागवत लावरे व नामदेव लावरे या चौघांनी माझ्या पत्नीला जातीवाचक बोलून तिचा अपमान केला. यांना फाशी देऊन मारू असे म्हणत शिवीगाळ केली. मुलाची सायकल ढकलून दिली. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

Web Title: Sangamner Threats to kill women with racist insults

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here