संगमनेर: बहिण भावावर बिबट्याचा हल्ला, दोघेही जखमी
Ahmednagar News | संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे घरी जात असताना अचानक उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोघा बहिण-भावावर हल्ला केल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
प्रवीण नरोडे त्याची बहीण पुजा नरोडे हे कोल्हेवाडी येथील नरोळे मळ्यात राहतात. प्रवीण नरोडे व त्याची बहीण पुजा नरोडे हे दोघे शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संगमनेर येथून घरी जात असताना यावेळी ते घराजवळ आले असता अचानक उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेऊन हल्ला केला. यावेळी दोघे भाऊ बहीण गाडीवरून खाली पडले. बिबट्याने हल्ल्यात पूजा नरोडे हिचा पायाला जबरी चावा घेत जखमी केले आहे. तसेच प्रवीणही हल्ल्यात जखमी झाला आहे. बहिण भावांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले, मात्र बहीण पूजा ही गंभीर जखमी असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नाशिक नाशिक येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
Web Title: Sangamner attack on sister and brother