Home अहिल्यानगर अहमदनगर: इमारतीत लिफ्ट कोसळून एक युवक ठार, तर तिघे जखमी

अहमदनगर: इमारतीत लिफ्ट कोसळून एक युवक ठार, तर तिघे जखमी

Ahmednagar Accident One youth was killed and three others were injured when an elevator collapsed

Ahmednagar Accident | अहमदनगर : अहमदनगरच्या मार्केट यार्ड भागातील एका इमारतीत लिफ्ट कोसळून एक युवक ठार झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी मदत कार्य केले.

या अपघातात शुभम झेंडे (वय १९) हा युवक ठार झाला. तर ओंकार निमसे (वय १९), प्रिया पवार (वय ४०) व शीतल चिमखडे (वय २५) हे तिघे जखमी झाले आहेत.

नगर शहरात स्टेशन रस्त्यावरील मार्केटयार्ड परिसरात अभय मशिनरी नावाचे तीन ते चार मजली दुकान आहे. त्या इमारतीत हा अपघात झाला. ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. त्यावेळी लिफ्टमधून चौघे प्रवास करीत होते. त्यातील एक युवक जागीत ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली. अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी सुरू आहे. तिघा जखमींपैकी एकाला जिल्हा सरकारी रुग्णालयात, तर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Ahmednagar Accident One youth was killed and three others were injured when an elevator collapsed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here