Home अकोले संगमनेर तालुक्यात १८ तर अकोलेत ५ जण करोनाबाधित

संगमनेर तालुक्यात १८ तर अकोलेत ५ जण करोनाबाधित

Sangamner Akole Corona News Updates Saturday 

संगमनेर: संगमनेर तालुक्यात शनिवारी १८ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर अकोले तालुक्यात पाच जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील प्राप्त अहवालानुसार घारगाव येथे ६० वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, ४ वर्षीय मुलगी, ६ वर्षीय मुलगा, कौठ कमळेश्वर येथे ५५ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ५० वर्षीय महिला, सुकेवाडी येथे ६७ वर्षीय पुरुष,पिंपळगाव देपा येथे ६६ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय मुलगी, राहणेमळा गुंजाळवाडी येथे ४८ वर्षीय पुरुष, अकोले रोड संगमनेर २५ वर्षीय पुरुष, जनतानगर संगमनेर येथे ६३ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ५० वर्षीय पुरुष, पिंपरी लौकी येथे ५५ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ५१ वर्षीय महिला, मांडवे खुर्द येथे ४१ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ६९ वर्षीय पुरुष, निमोन येथे २८ वर्षीय महिला असे १८ जण बाधित आढळून आले आहेत.

अकोले तालुक्यात शनिवारी गणोरे येथे ६० वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ९ वर्षीय मुलगा, ६ वर्षीय मुलगी, समशेरपूर येथे ५३ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय तरुणी असे ५ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ३११२ इतकी झाली आहे.  

Web Title: Sangamner Akole Corona News Updates Saturday 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here