संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कांदे घेऊन जाणारा मालवाहू ट्रक उलटला
संगमनेर | Accident: नाशिक पुणे महामार्गावर कर्जुले पठार शिवारात कांदे घेऊन जाणारा मालवाहू ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील अपघाताची (Accident) मालिका सुरूच आहे. सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. सदर अपघाताच्या घटनेतून चालक व वाहक थोडक्यात बचावले आहे.
कर्जुले पठाराच्या शिवारात रस्त्याच्या कडेने अपघात झाल्याने रस्त्यावर कांद्याच्या गोण्या पडलेल्या होत्या. सर्वत्र कांदेच पडल्याचे दिसून आले. सदर मालवाहू ट्रक कांदे घेऊन इंदोर येथून पुणे येथे चालला होता. दरम्यान कर्जुले पठार शिवारात सदर मालवाहू ट्रक उलटून अपघात ग्रस्त झाला. या अपघातात मालवाहू ट्रकसह कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Web Title: Sangamner Accident truck carrying onions overturned on Nashik-Pune highway