Home Accident News संगमनेर: टँकर आणि कंटेनर मध्ये भीषण अपघात

संगमनेर: टँकर आणि कंटेनर मध्ये भीषण अपघात

Sangamner Accident tankar and Container 

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौकात गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास टँकर आणि कंटेनर मध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात टँकर रस्त्यावर पलटी झाला तर कंटेनर रस्त्याच्या कडेवर असलेल्या घरात शिरला. या अपघातात दोनही वाहनातील चालक जखमी झाले आहेत. कंटेनर घरावर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेरकडून भरधाव वेगाने कोपरगावकडे जाणारा टँकर व लोणीकडून नाशिककडे जाणारा कंटेनर तळेगाव येथील चौकात समोरासमोर आले असता वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकमेकांना धडकली. या अपघातानंतर टँकर आडवा होत पलटी झाला आणि कंटेनर एका घरावर जाऊन आदळला. अचानक झालेल्या घटनेमुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वाहन चालकांना उपचारासाठी रुग्नालयात पाठविण्यात आले.  

Web Title: Sangamner Accident tankar and Container 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here