Uddhav Thackeray: साई संस्थानने इतर संस्थांसमोर आदर्श निर्माण केला: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिर्डी |Uddhav Thackeray: कोरोना संकट काळात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व आरटीपीसीआर लॅबची निर्मिती करून साई संस्थाने माणुसकीची शिकवण जपताना राज्यातील इतर संस्थासमोर एक आदर्श उभा केला आहे अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई संस्थानच्या कार्याचे कौतुक केले आहे.
साई भक्तांच्या देणगीतून उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर आरटीपीसीआर लॅबचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन लोकार्पण केले.
यावेळी अजित पवार म्हणाले साई संस्थानने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. ऑक्सिजन तुटवडा असल्याने उद्योगाकरिता लागणारी ऑक्सिजन निर्मिती करून ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य दिले आहे.
करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. साईबाबा यांनी कायमच गरीब-गरजूंना मदत केली आहे. त्यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो भक्त देश आणि विदेशात आहेत, असे नमूद करताना संस्थानने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा रुग्णांचे जीव वाचविणारा ठरेल. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
Web Title: Sai Sansthan set an example Uddhav Thackeray