दोन गुन्हेगारांना पाच जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार
कर्जत | Rashin: राशीन ता. कर्जत येथील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले दोन गुन्हेगारांना पोलिसांनी एक वर्षासाठी पाच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
अहमदनगर, सोलापूर, बीड, औरंगाबाद, पुणे या पाच जिल्हातून तडीपार करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
राम जिजाबा साळवे वय २६ व सागर नवनाथ साळवे वय २४ दोघेही रा. राशीन असे तडीपार केलेल्यांची नावे आहे.
या दोन गुन्हेगारांविरोधात मारामारी करणे, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते वारंवार गुन्हे करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना पाच जिल्ह्यातून तडीपार करावे असा प्रस्ताव अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाची चौकशी करून दोघांना पाच जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहे. त्या दोघांना तडीपारची नोटीस बजावली आहे.
Web Title: Rashin Two criminals were deported from five districts for one year