तलाठ्यास लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले
कोपरगाव | Bribe: कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील तलाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना २९ मे रोजी घडली. सुशील राजेंद्र शुक्ला असे या तलाठ्याचे नाव आहे. सदर तलाठीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार यांच्या वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ६८ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी २८ हजारांची लाच स्वीकारताना शुक्ला यांना शहरातील गॅस गोदामालगत रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने व अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे व पोलीस अधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंके, पोलीस नाईक प्रवीण महाजन, गरुड, गवळी, कराड या पथकाने केली आहे.
Web Title: bribe from Talathi the bribery department caught