अकोलेतील तरुणाकडून विवाहित महिलेवर अत्याचार
Ahmednagar News | अकोले | Akole : अकोले तालुक्यातील मेहन्दुरी येथील एका २५ वर्षीय अविवाहित तरुणाने तीन अपत्य असलेल्या विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेने अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
सुशील उमाजी बंगाळ रा. मेहंदूरी असे या आरोपीचे नाव आहे. मेहन्दुरी येथील एका विवाहितेवर सुशील याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अकोले पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सदर फिर्यादी महिलेस तीन अपत्य आहेत. आरोपी व फिर्यादी एकाच गावातील रहिवाशी आहेत. हे दोघेही काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात आल्याने त्यांचे प्रेम जडले. यांच्यांत नंतर सलोख्याचे संबंध राहिले. दरम्यानच्या काळात दोघांत वादविवाद निर्माण झाले. आरोपी व फिर्यादी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी काहींनी मध्यस्थी केली. मात्र महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठले.
या दोघांत सोशियल मेडियाच्या माध्यमातून व मोबाईलवर संपर्क होत होता. आरोपीने पिडीतेस मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणून लग्नाची मागणी केली. तेव्हा पीडिता म्हणाली मला तीन मुलं आहेत. त्यांचा सांभाळ करण्याचा वचन आरोपीने दिले. २० सप्टेंबर २०२१ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत त्यांनी घर सोडले.व ते पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार गावात जाऊन राहू लागले. या कालावधीत महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला आहे. सुशील उमाजी बंगाळ याच्याविरुद्ध बलात्काराचा (rape) प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करणयात आला आहे.
Web Title: Rape trying Atrocities on a married woman by a young man from Akole