ट्रक चालकाकडून साडे सहा लाखांच्या खाद्याची परस्पर अफरातफर
Ahmednagar crime | सोनई | Nevasa News: ट्रकमधील साडेसहा लाख रुपये किमतीच्या कोंबडी खाद्याच्या 300 बॅगची घोडेगाव येथून परस्पर अफरातफर करून विल्हेवाट लावून विश्वासघात करून फसवणूक केली. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात ट्रकचालकवर गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत त्रिगुण धनाजी पवार (वय 35) धंदा ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर रा. माढा जि. सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, चाफा कंपनी सुपा एमआयडीसी येथून कोंबडी खाद्याचा ट्रक (एमएच 11 एएल 5596) भरून तो सांगितलेल्या ठिकाणी पोहच करायचा होता. मात्र चालक सुधीर ईश्वर जावीर हल्ली रा. बाभळेश्वर, ता. राहाता, मूळ रा. व्हळे ता. पंढरपूर जि. सोलापूर याने ट्रक घोडेगाव चौफुला येथील एच पी पेट्रोल पंपासमोर लावून दुसरीकडेच नेऊन अफरातफर करून परस्पर विल्हेवाट लावली.
ट्रक मध्ये 2 लाख 81 हजार 905 रुपये किंमतीची प्री-स्टार्टर जातीची चाफा कंबल पांढर्या रंगाचा बॉयलर कोंबडीचे व पिल्लाचे चित्र असलेले कोंबडी खाद्याच्या 130 बॅगा, 3 लाख 61 हजार 675 रुपये किमतीची स्टार्टर जातीची जापा कंबल कंपनीची पांढर्या रंगावर बॉयलर कोंबडीचे चित्र असलेली त्यावर हिरवा व निळ्या रंगाची पट्टीवर खाद्य जातीचे नाव लिहिलेली खाद्याचे 170 नग असे एकूण 6 लाख 43 हजार 480 रुपये किंमतीच्या बॅगा होत्या. या सर्व मालाची चालकाने परस्पर विल्हेवाट लावली.
या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 18/ 2022 भादंवि कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पोसई विक्रम मिसाळ हे करीत आहे.
Web Title: Nevasa Crime Fraud Rs 6.5 lakh from a truck driver