प्रियकराने अत्याचार, गर्भपात, ब्लॅकमेल, तरुणीने गळफास घेत आत्महत्या
Breaking News | Crime: प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. त्यातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीला गर्भपात, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रियकर ब्लॅकमेल, तरुणीने संपविले जीवन.
छत्रपती संभाजीनगर: पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. त्यातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही लग्नाविनाच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रियकर ब्लॅकमेल करून लागला. या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन शनिवारी सायंकाळी आत्महत्या केली. ही घटना पिसादेवी परिसरात घडली. या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या आईच्या विरोधात लैंगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
प्रियकर ऋषिकेश विनायक तळेकर व त्याची आई सुरेखा विनायक तळेकर (रा. अयोध्यानगर, एन-७, सिडको) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार दीक्षा (नाव बदललेले) ही आरोपी ऋषिकेशसोबत २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होती. याच कालावधीमध्ये आरोपीने दीक्षाला लग्नाचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला दिवस गेले. त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने जबरदस्तीने दीक्षाला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही ऋषिकेश लग्नाविनाच तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. ती दबावाला बळी पडत नसल्याचे पाहून त्याने तिला बदनामीची भीती दाखवत जबरदस्ती सुरू केली. तेव्हा तिने आरोपीला विनंती केली. त्याने नकार देत लग्न न करताच सोबत राहण्यासाठी ब्लॅकमेल करण्यास सुरू केले. सततच्या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
Web Title: Rape by boyfriend, abortion, blackmail, girl commits suicide by hanging herself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study