Home Suicide News अनैतिक संबधाच्या कारणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अनैतिक संबधाच्या कारणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Rahuri young man Suicide 

राहुरी | Rahuri Suicide: अनैतिक संबधाच्या कारणातून एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविण्याची घटना राहुरी कारखाना येथील नगर मनमाड महामार्गालगत एका शेतात घडली आहे.

सुनील कांतीलाल गायकवाड वय २८ असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या तरुणाचा चुलत भाऊ बाळासाहेब बन्सी गायकवाड हा बांधकाम क्षेत्रात मोलमजुरीचे काम करीत होता. त्याच्याकडे मयत सुनील हा दोन दिवसांपूर्वी पुणे येथून आले असता त्याच्या चुलत भावास अनैतिक संबधातील सर्व माहिती सांगून त्या मुलीच्या घरचे मला जीवे मारतील त्यामुळे मला भीती वाटत आहे. चुलत भावाने मयत सुनील याची रात्रभर समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र पहाटे ३ वाजेनंतर चुलत भाऊ व त्याच्या घरातील व्यक्ती झोपी गेले असता मयत सुनील याने घरातून बाहेर पडत नगर मनमाड महामार्गालगत एका शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटविण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Rahuri young man Suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here